छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करणार नसल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नुकतंच बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी एका प्रसिद्ध कलाकाराचे नाव समोर येत आहे.

Bigg Boss Marathi 4 : चालतंय की! राणादाचा ‘जीव’ बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये रंगणार, पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर!

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होस्ट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या विविध भूमिका साकारताना दिसत आहे. तो मराठीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटातही त्याने महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करु शकतो असे बोललं जात आहे.

‘बिग बॉस मराठी’ ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर पाहिलात का?

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पण अद्याप याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सिद्धार्थनेही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तो नक्की हे पर्व होस्ट करणार की नाही याबद्दल विविध तर्क-विर्तक सुरु झाले आहेत.

दरम्यान सध्या सिद्धार्थ जाधव हा दे धक्का 2 या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader