कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉसने काल (सोमवार) आगळावेगळा टास्क दिला. बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्त्वाचा नियम शिथिल करण्यात आला. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी आहे. पण यामध्ये बिग बॉसने एक अट घरातील सदस्यांना घातली आहे. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तासच झाला पाहिजे. काल घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सई, मेघा आणि स्मिता नॉमिनेट झाले. त्याचप्रमाणे बिग बॉसने दिलेले सिक्रेट कार्य शर्मिष्ठा आणि नंदकिशोरने पार न पाडल्यामुळे ते दोघेदेखील नॉमिनेट झाले. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस घरातील सदस्यांना नेहमीच काही ना काही सरप्राइज देत असतात. आणखी एक सरप्राइज आज (मंगळवार) घरातील सदस्यांना मिळणार आहे. लोकप्रिय मालिका घाडगे & सूनमधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक बिग बॉसच्या घरी हजेरी लावणार आहेत. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे.

वाचा : संभाजीराजे – दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार?

बिग बॉस सदस्यांवर एक कार्य सोपवणार आहेत. घरोघरी मातीच्या चुली असं या कार्याचं नाव असणार आहे. यामध्ये मेघा पुष्करला बरीच अतरंगी कामं देणार आहे. आता ही कामं घरातील सदस्य कशी पूर्ण करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi ghadge and sun fame sukanya kulkarni mone and atisha naik in bigg boss house