Bigg Boss Marathi Grand Finale : शर्मिष्ठा राऊतनंतर आस्ताद काळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला आहे. ग्रँड फिनालेकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांपैकी सर्वांत आधी शर्मिष्ठा बाद झाली. त्यापाठोपाठ आस्ताद बाहेर पडला. त्यामुळे आता घरात फक्त चार स्पर्धक राहिले आहेत. मेघा धाडे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि सई लोकूर यांच्यामध्ये ही चुरस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिग बॉसच्या घरातील आस्तादचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता. पुरुषांपैकी आस्ताद आणि पुष्कर या दोघांनी ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली. आस्तादला पुष्करची जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. कारण लोकप्रियता आणि बिग बॉसच्या घरातील वावर पाहता पुष्कर नेहमीच आस्तादपेक्षा उजवा ठरला.

Bigg Boss Marathi : ‘ग्रँड फिनाले’मध्ये सई- पुष्करची रोमॅण्टिक केमिस्ट्री

आस्तादच्या एक्झिटनंतर ग्रँड फिनालेची उत्सुकता अधिकच वाढली असून विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.