बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमधून सई लोकूर ही तिसरी स्पर्धक बाहेर पडली आहे. त्यामुळे आता घरात मेघा धाडे, पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर हे तिघे राहिले आहेत. ग्रँड फिनालेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून बिग बॉस मराठीचं विजेतेपद कोण पटकावणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सई आणि पुष्करची मैत्री बिग बॉसच्या घरात आणि बाहेरही सर्वाधिक चर्चेत राहिली. पुष्कर आणि सई दोघे सतत एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच नव्हे तर ते दोघे एकमेकांना पहिल्या भागापासून मदत करताना दिसून आले आहेत. त्यामुळे सई बाद झाल्यानंतर पुष्करला रडू अनावर झालं.
#SaiLokur झाली #BBMarathiFinale मधून Eliminate…
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 22, 2018
खरंतर सई विजेती ठरू शकते असा अंदाज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत होता. मात्र सईला मेघाकडून जबरदस्त टक्कर होती. सईच्या तुलनेत मेघाची लोकप्रियता बरीच वाढली आहे. त्यामुळे आता सईनंतर मेघा यात बाजी मारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.