बिग बॉस मराठीच्या घरात आजदेखील (मंगळवार) ‘मस्ती की पाठशाला’ हा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये काल सई आणि आस्ताद शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. स्पर्धकांनी बरीच धमालमस्ती केली. आज मेघा, शर्मिष्ठा, आणि पुष्कर शिक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हा टास्क करत असताना घरातील सदस्यांना शाळेची आठवण येत असणार हे निश्चित. आज मेघा विद्यार्थी झालेल्या सदस्यांना बरीच दमछाक करायला लावणार आहे. मेघा शिक्षिका असताना विद्यार्थ्यांनी बराच दंगा केल्याचं पाहायला मिळालं. मेघाला त्रास देण्यासाठी सर्व विद्यार्थी बाथरुममध्ये गेले असता ती बाथरुमचं दार बंद करत त्यांना आतच कोंडणार आहे. तर शर्मिष्ठाच्या वर्गात सर्वजण चित्रकलेत रमणार आहेत.

या अनोख्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. बिग बॉस मराठी अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता घरात फक्त सहा स्पर्धक राहिले आहेत. यापैकी एक स्पर्धक बाद होणार असून पाच जण अंतिम फेरीत पोहोचणार आहेत.

Story img Loader