बिग बॉस मराठीच्या घरात रहिवाशी संघाला मागील दिवशी दिलेल्या कार्याचे पडसाद लवकरच दिसून येणार आहेत. बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची संघर्षगाथा सांगण्याची संधी दिली. या टास्कमध्ये एकेक करून प्रत्येक स्पर्धकाने त्यांची संघर्षगाथा सांगण्यास सुरुवात केली. बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारे अनिल थत्ते यांची वेळ येत येताच त्यांनी आपली संघर्षगाथा न सांगता जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Bigg Boss Marathi: कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवा कॅप्टन?

या टास्कमध्ये अनिल थत्ते यांनी बराच वेळ घेऊन अनावश्यक गोष्टी देखील स्पर्धकांना सांगितल्या. या कारणामुळे आस्ताद काळे अनिल थत्ते यांच्यावर चिडला आणि त्यांना खडसावून सांगितलं की, इतका वेळ आपल्याकडे नसून त्यांनी लवकरात लवकर एक महत्वाचा क्षण सांगून आपलं बोलणं संपवावं. अनिल थत्ते यांच्या अशा वागण्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना त्यांची संघर्षगाथा सांगायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याच मुद्द्यावरून मेघा आणि आरती या दोघांनीही आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. मेघा आणि आरतीने त्यांना न पटलेली ही गोष्ट अनिल थत्ते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या अशा वागण्यामुळे आरतीला पुरेसं बोलता न आल्याचा रागदेखील व्यक्त केला.