बिग बॉस मराठीच्या घरात काल (बुधवारी) आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले. पण, बिग बॉस यांनी काल सदस्यांना त्यांच्यावरचे आरोप खरे आहेत कि खोटे हे इतर सदस्यांना आणि प्रेक्षकांना पटवून देण्याची संधी दिली. ‘टिकीट टू फिनाले’ मिळवल्यानंतर पुष्कर या कार्यामध्ये न्यायाधीश आणि आस्ताद वकील बनला. ज्यामध्ये मेघावर बरेच आरोप केले गेले. ज्यामुळे मेघा, पुष्कर आणि सई यांच्यात बरेच वाद झाले. कार्यानंतर बिग बॉसने फायनलिस्टची नावं घोषित केली. ज्यामध्ये सईचे नाव न घेतल्याने पुष्कर, मेघा आणि सईला खूप मोठा धक्का बसला. परंतु थोड्या वेळातच बिग बॉसने सहा फायनलिस्ट असतील असे घोषित केले आणि सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला. आज बिग बॉस मराठीच्या घरात पत्रकार परिषद रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Bigg Boss Marathi : आस्तादच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण माहित आहे का?

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. ज्यामध्ये मेघा, आस्ताद, शर्मिष्ठा, सई, पुष्कर आणि स्मिता यांना बरेच प्रश्न विचारले जाणार आहेत. या पत्रकार परिषदाची सांगता आस्ताद काळे त्याच्या गाण्याने करणार आहे. घरातील सदस्यांना पत्रकारांना त्यांच्यासमोर बघून खूपच आनंद होणार आहे. कोण आहे फेक ? कोण आहे रिअल ? घरातून बाहेर पडल्यावर सदस्यांना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ? कोणाला भेटायचे आहे ? मेघा का बोलली खोट ? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या भागात मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi press conference in the bigg boss house finalists will give answers