बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शो बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती आविष्कार दारव्हेकरने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. पहिल्या दिवसापासूनच या दोघांच्या भूतकाळाबद्दल घरात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. अलिकडच्या भागात आविष्कारने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी विषयी आणि त्यांचे हे लग्न का मोडले या विषयी मोठा खुलासा केला आहे.

आविष्कार त्याचा सहस्पर्धक जय दुधानेला सांगिताना दिसला की जेव्हा स्नेहा वाघ आणि त्याचे नातं तुटलं तेव्हा स्नेहाने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. एव्हढंच नव्हे तर घटस्फोटानंतर त्याला मद्यपानाचे व्यसन लागले होते आणि तो कबीर सिंग बनला होता, असे तो जयला सांगताना दिसला. यावर जय आविष्कारला म्हणाला की घरात तर स्नेहा ही खूप शांत आणि साध्या स्वभावाचे व्यक्तिमत्व वाटते. तर आविष्कारने सांगितले की ती अजिबात शांत नाही आहे आणि तिचे खरे रुप लवकरच समोर येईल.

Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
Hemant Dhome Shared Special Post For Amey Wagh
“अमुडी आता…”, हेमंत ढोमेने अमेय वाघसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा…”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
Sudesh Lehri
घर विकलं, चपला बनवल्या, भाजीपाला विकला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कठीण काळ

आविष्कार पुढे म्हणाल, “स्नेहा ही घरात स्पर्धक म्हणून येणार आहे हे मला माहिती नव्हते आणि मला माझ्या भूतकाळात परत जायची अजिबात इच्छा नाही, बहुतेक इतके वर्षांनी हे दोघे एकत्र कसे राहतात हे बिग बॉसला दाखवायचे असेल म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला एकत्र आणले असावे”. तसंच बिग बॉस मराठीने त्याला आयुष्यात दुसरी संधी दिली आहेआणि तो याची कदर करतो असल्याचे तो जयला सांगताना दिसला आहे.

अवघ्या १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखती मध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. 

Story img Loader