बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शो ला सुरू होऊन दोनच दिवस झाले असले तरी हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे. यात स्पर्धक एकीकडे वाद तर दुसरीकडे दंगा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात घरी कवितांची मैफिल रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसाची सुरूवात नेहमी प्रमाणे गाण्याने झाली घरात उपस्थित असलेले सर्व स्पर्धक गाण्याच्या तालावर नाचताना दिसले. नंतर बेडरुममध्ये सगळे जण गप्पा मारत असताना अभिनेता आविष्कार दारव्हेकरने एक सुंदर कविता ऐकवली. ही कविता ऐकल्यावर त्याच खोलीत उपस्थित असलेली स्नेहा वाघची रिएक्शन बघण्या सारखी होती. कलर्स मराठी वाहिनीने ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे. या पोस्टला “आविष्कार कवितेतून घालू पाहतोय साद, पण त्याच्या कवितेला कोणाची हवीय दाद? पाहा”, असे कॅप्शन दिले आहे.

आविष्कारची ही कविता ऐकताच नेटकरी या पोस्टवर कमेंट करताना दिसले. एका युजरने लिहिले, “हे फक्त बिग बॉस करु शकतो दुर झालेली नाती जवळ येतात जे कोणालाच नाही जमत, जमते ते बिग बॉसला ” दुसऱ्या युजरने लिहिले, “स्नेहा वाघची हवी आहे दाद “. तर तिसऱ्या युजरने संताप व्यक्त करत लिहिले, ” जेव्हा ती तुझी बायको होती तेव्हा तिला छळायचास याने आणि त्यांच्या आई बाबांनी तिचा जिव नकोसा केला! आणि आता खोट्या गोड कविता करत फिरतोय.”

स्नेहाने दोन विवाह केले असून तिचा दोनदा घटस्फोट झाला आहे. आविष्कार हा स्नेहाचा पहिला पती आहे. फक्त १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. आता बिग बॉसच्या घरात त्यांच्यात कसे नाते असेल हे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 3 day 1 avishkar darwhekar special poem aad