‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ ही अनोखी टॅगलाइन घऊन हा शो आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शो साठी अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावं समोर येत आहेत.  या यादीत ‘शुभमंगल ऑनलाईन’मधील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सुयश टिळक देखील भाग घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता सुयशने यावर आपले मौन सोडले आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत या बाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सुयश टिळक हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तो  सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. तसंच वेळोवेळी स्वतः च्या कामा बाबतचे अपडेट त्याच्या फॅन्सना देत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून सुयश ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी होणार अशा चर्चा रंगत होत्या. सुयशने  नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने ‘बिग बॉस मराठीच्या’ च्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी होणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याचा शो ‘शुभमंगल ऑनलाईन’ चे शूटिंग संपल्याची माहिती दिली.  तसंच “मी नवीन प्रवासासाठी तयार आहे, याचा अर्थ असा नाही की मी बिग बॉस मराठी मध्ये सहभागी होणार नाही आहे आणि  कृपा करून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका.” असे कॅप्शन मध्ये लिहिले आहे.

यापूर्वी, ट्रान्सजेंडर आणि युवा डान्सिंग क्वीन होस्ट गंगा म्हणजेच ​​प्रणित हाटे यांनी देखील शोमध्ये सहभागी होण्याच्या अफवा फेटाळल्या होत्या. अभिनेत्री आणि तुझा माझा ब्रेकअप फेम केतकी चितळे यांनी देखील पुष्टी केली की ती बिग बॉस मराठीच्या आगामी सिझनचा भाग नाही. संभाव्य स्पर्धकांच्या अनेक याद्या सोशल मीडियावर फिरत आहेत.