छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ हा कायमच लोकप्रिय असतो. मराठी बिग बॉस सुरु झाल्यापासून हा शो कायमच सुपरहिट ठरला आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमातील स्पर्धकांची नावं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता हार्दिक जोशी, किरण माने यानंतर आता आणखी एका अभिनेत्याला बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याचे तिन्ही पर्व सुपरहिट ठरले होते. या पर्वासाठी कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता एका वादग्रस्त अभिनेत्याचे नाव समोर येत आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. फक्त एकटा अनिकेत नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Prajakta Mali
“मी बॉस असणं खूप जणांना खुपलं”, प्राजक्ता माळी म्हणाली, “त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत…”

गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी स्नेहा हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. फक्त अनिकेतवर नव्हे तर संपूर्ण कुटुंबाविरोधात हिंसाचाराचे आरोप करत तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याबद्दल अनिकेतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता ते दोघे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाचा कुठेही गाजावाजा न करता अगदी निवडक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. अनिकेत आणि स्नेहाची ओळख हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटाच्या वेळी झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ दरम्यान अनिकेतची पत्नी अभिनेत्री स्नेहा विश्वासरावने पती, सासू आणि सासरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २१ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रक्षेपणाची तारीख ठरली

या संपूर्ण प्रकरणानंतर आता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण हे दोघे बिग बॉसच्या घरात एकत्र येण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला नवरा आविष्कार दार्व्हेकर सहभागी झाले होते. त्याच्या नात्यातील ट्विस्टमुळे शो चांगलाच हिट झाला होता. त्यामुळेच अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी होऊ शकतात असे बोललं जात आहे.

Story img Loader