छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच लोकप्रिय ठरले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा प्रोमो अगदीच हटके पद्धतीचा आहे. मराठी मनोरंजनाचा Bigg Boss येतोय, लवकरच…आपल्या कलर्स मराठीवर, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. त्यासोबत रंग मनाला भिडणारे असा हॅशटॅगही हा प्रोमो शेअर करताना देण्यात आला आहे. त्यासोबतच कलर्स मराठी, बिग बॉस मराठी ४, BBM4, असे हॅशटॅगही शेअर करण्यात आले आहेत. बिग बॉसच्या या नव्या पर्वामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Bigg Boss Marathi 3 Winner : बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, विशाल निकम ठरला विजेता

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा टीझर समोर येताच याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात बिग बॉसच्या घरात नेमकं कोण-कोण दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे. पण पहिल्या तिन्ही पर्वांपेक्षा वेगळा असणार असल्याचे दिसत आहे. घरात रंगणारे राडे, नवनवीन टास्क, सदस्यांमधील मैत्री आणि वाद या सगळ्याच कारणांसाठी तीनही सीझन लोकप्रिय ठरले. यात तिसऱ्या सीझनच्या स्पर्धकांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या सीझनमधील स्पर्धक आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कसर सोडत नाहीत. त्यामुळेच या स्पर्धकांसारखे नवे स्पर्धक वा नवा सीझन कधी भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती.

पण आता या पर्वाच्या नव्या टीझरमुळे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. तसेच यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 4 announced by colors marathi teaser release nrp