‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ‘ALL IS WELL’ अशी असणार आहे. बिग बॉसचे नवे पर्व सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र त्यापूर्वीच या कार्यक्रमातील स्पर्धकांची नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धकाची झलक समोर आली आहे.
कलर्स मराठीने नुकतंच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे प्रिमिअर सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या डान्सने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तिचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात रंगणार बोल्डनेसची जादू, पहिल्या स्पर्धक जोडीचा व्हिडीओ समोर
“हिची अदा बघून सगळेचं होणार फिदा, BIGG BOSS मराठीच्या मंचावर अवतरणार ही अप्सरा… सांगा आहे तरी कोण? BIGG BOSS मराठी” Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर”, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तिच्याबद्दल विविध तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी ती समृद्धी जाधव असल्याचे म्हटले आहे. समृद्धी ही स्प्लिट्सविला १३ मध्ये सहभागी झाली होती. यात तिने सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.
आणखी वाचा : “केमोमुळे माझे केस गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव
दरम्यान यासह बिग बॉसच्या टीमने एक प्रोमो शेअर केला आहे. यात एक जोडी अतिशय बोल्ड डान्स करताना दिसत आहे. मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर ते दोघेही नाचताना दिसत आहे. पण यात त्या दोघांचा चेहराही लपवण्यात आला आहे. त्यांचेही नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या ‘बिग बॉस’ मराठीमध्ये कोण कोणते कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. त्यातच ‘बिग बॉस’ मराठी’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.