छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि कायमच चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. हा शो कायमच सुपरहिट असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे चौथे पर्व येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक दिसणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. त्यातच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यात त्यांनी बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक जोडीची झलक दाखवली आहे.

कलर्स मराठीकडून नुकतंच बिग बॉसच्या प्रिमिअर सोहळ्याचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत एक जोडी अतिशय बोल्ड डान्स करताना दिसत आहे. मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर ते दोघेही नाचताना दिसत आहे. पण यात त्या दोघांचा चेहराही लपवण्यात आला आहे. तसेच नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
आणखी वाचा : “केमोमुळे माझे केस गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव

“मंचावर रंगणार दिलखेचक अदाकारी, कोण असतील हे स्पर्धक? बिग बॉस मराठी ग्रँड प्रिमिअर 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही तरुणी अभिनेत्री नेहा खान असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. “असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत टीव्ही बघतो. खूप खराब..माझा ८ वर्षाचा मुलगा सुद्धा बघतो ..तो हसत होता …मी काहीच बोलू शकली नाही.. स्वामी समर्थ सिरीयलच्या मध्ये ही घाणेरडी अॅड आली..कृपया भान ठेवावं”, असा संताप एका नेटकऱ्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या तीनही पर्वांप्रमाणे चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना क्वॉरंटाईनची अट काढून टाकण्यात आली आहे. ई-टाईम्सने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader