बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना घरातून शर्मिष्ठा राऊत बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार शर्मिष्ठा बिग बॉस मराठीतून बाद झाली आहे. त्यामुळे आता अंतिम लढतीसाठी पाच स्पर्धक घरात राहिले आहेत. आस्ताद काळे, मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर या पाच जणांपैकी एक बिग बॉस मराठीचा पहिला विजेता ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिअॅलिटी शोच्या शेवटच्या आठवड्यात कोणालाही बाद न करता सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार असं बिग बॉसने जाहीर केलं होतं. मात्र आता अचानक शर्मिष्ठा घरातून बाहेर पडल्याचं समजल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर शर्मिष्ठाच्या एक्झिटचं ट्विस्ट हे आधीच ठरवलेलं होतं असंही म्हटलं जात आहे.

वाइल्ड कार्ड एण्ट्रीने शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाली होती. मेघा आणि तिच्यातली मैत्री बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरला आणि मेघामुळे ती प्रभावित होत असल्याचा आरोपही बऱ्याचदा घरातील इतर स्पर्धकांकडून केला गेला. तर दुसरीकडे मेघाकडे विजेतेपदाची प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रँड फिनालेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून कोण विजेता ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.