छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन वेगवगेळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. या आठवड्याच्या ‘हल्लाबोल’ टास्कमध्ये उत्कर्ष संचालकाच्या भूमिकेत होता. टास्कदरम्यान त्याने पक्षपात केल्याबद्दल विकेण्डला बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर उत्कर्ष शिंदेची शाळा घेताना दिसले. त्यानंतर उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे त्याला सपोर्ट करताना दिसला आहे. आदर्शने त्याच्या सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत भावाला सपोर्ट केला आहे. या पोस्टमध्ये ‘बिग बॉस मराठी’ ला डबल ढोलकी असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टमुळे नेटकरी त्याच्यावर सांतापलले असून आदर्श सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

आदर्शने सोशल मीडियवार एक पोस्ट शेअर करत शोमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल त्याचे मत मांडले आहे. “सुरवातीला उत्कर्ष शिंदे याचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते. तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टनसीसाठी केला. याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला”, अशा आशयाची मोठी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
Suraj Chavan
“बघा माझ्या लेकाने काय केलंय…”, हातात बिग बॉसची ट्रॉफी बघून वडिलांची ‘अशी’ असती प्रतिक्रिया; सूरज चव्हाण म्हणाला…

पहा पोस्ट-

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

टास्कदरम्यान नेमक काय झालं?

गेल्या आठवड्यात सपर्धकांना ‘हल्लाबोल’ हा टास्क देण्यात आला होता. या टास्कच्या वेळेस संचालक, कॅप्टन उत्कर्ष एकाच गटाच्या बाजूने निर्णय घेत असल्याचे महेश यांना दिसले. टीम ‘बी’ मधील सदस्य सोनाली पाटील जेव्हा मिठाचे पाणी टीम ‘ए’ वर फेकत होती त्यावेळी उत्कर्षने तिला अडवले. मात्र टीम ‘ए’ ने मिरच्यांचा वापर टीम ‘बी’ वर केला तेव्हा उत्कर्षने त्यांना अडवले नाही. असा भेदभाव का केला?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी ‘बॉसची चावडी’ या एपिसोडच्या वेळीस केला होता.