हिंदी बिग बॉसचे मराठी रुपांतर ‘बिग बॉस मराठी’च्या पर्वाचा अंतिम टप्पा सुरू आहे. या पर्वाला सुरुवात झाल्यापासूनच बरेच रंगतदार वळण त्यात आले. आता सहा जणांनी अंतिम फेरी गाठली आहे. मेघा धाडे, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत हे सहा स्पर्धक जवळपास ९० दिवसांच्या चढउतारांनंतर अंतिम फेरीत पोहोचले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील तिखट मिरची अर्थात मेघा धाडेनं आपला खेळ उत्तमरित्या खेळत घरात स्वत:चं स्थान टिकून ठेवलं आहे. म्हणूनच तिला विजेतीपदाची प्रमुख दावेदार मानलं जात आहे.

या शोमध्ये मैत्रीपेक्षा जिंकण्याला महत्त्व देणारी मेघा आपल्या तिखट बोलण्यामुळे चांगलीच चर्चेत असते. रोज काही ना कारणांमुळे मेघा चर्चेचा विषय ठरत आली. ‘बिग बॉस’च्या घरात क्वचितच असे स्पर्धक असतील ज्यांच्याबरोबर मेघाचा वाद झालेला नाही. मेघा तिच्या रोखठोक बोलण्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. प्रत्यक्ष आयुष्यातही मेघा याच स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. तिला अभिनयासोबतच स्वयंपाक करणे आणि गाणी म्हणण्याची विशेष आवड असल्याचं बिग बॉसच्या घरात दिसून आलं. सर्वांसाठी स्वयंपाक करणं असो किंवा टास्कमध्ये जिंकण्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करणं, या सर्व गोष्टी मेघा लक्षपूर्वक करताना दिसली.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता? 

ख-या आयुष्यात मेघाने जरी अनेक समस्यांना तोंड दिले असले. तरी ती कणखर असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दाखवून देत आहे. या घरात सध्या प्रत्येक स्पर्धक खेळ जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत असून मेघा खेळामध्ये मैत्री आणत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चा किताब जिंकण्यासाठी मेघा ख-या अर्थाने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader