मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आरोग्याशी संबंधित काही गोष्टींशी सामना करीत असतात. काही कलाकार याबद्दल खुलेपणाने प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र, काही कलाकार स्वत:च्या आजाराबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत मोकळेपणाने पोहोचवत असतात आणि त्या बाबतीत चाहत्यांना जागरूकही करीत असतात. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री व ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT 3) ची जेती सना मकबूलने (Sana Makbul) नुकताच तिच्या आरोग्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, ती ऑटोइम्युन हेपेटायटिस (Autoimmune Hepatitis) नावाच्या आजाराने ग्रस्त आहे, जो यकृतासंबंधित गंभीर आजार आहे. या आजारात शरीराच्या पेशी यकृतावर हल्ला करतात. ज्यामुळे आरोगयाच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

२०२० मध्ये आजारपणाबद्दल कळलं तेव्हा…

सना मकबूलने (Sana Makbul) सांगितले की, तिला २०२० मध्ये हा आजार झाला होता. सुरुवातीला कोणतीही विशिष्ट लक्षणे नव्हती, परंतु हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर जेव्हा तिची चाचणी करण्यात आली तेव्हा तिला ऑटोइम्युन हेपेटायटिस (Autoimmune Hepatitis) असल्याचे आढळून आले. याबद्दल बोलताना सना म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी माझ्या यकृतावर हल्ला करत आहेत. कधीकधी हा आजार ल्युपससारखा दिसतो, जो मूत्रपिंडांवर परिणाम करू शकतो किंवा संधिवातही होऊ शकतो”.

आजाराचा सामना करण्यासाठी औषध व स्टिरॉइड्सची मदत

पुढे सना मकबूल (Sana Makbul) म्हणाली की, “या आजाराशी लढण्यासाठी तिला अनेक औषधांची मदत घ्यावी लागते. यासाठी ती स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्ट्स घेत आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याबद्दल डॉक्टरांचे मत स्पष्ट नाही. हा आपल्या जीवनशैलीसंबंधित विकार आहे. यामुळे माझी तब्येत सतत बदलत असते. कधीकधी मला बरे वाटते, तर कधीकधी मला खूप अशक्तपणा जाणवतो. मला माहित नाही आता हे पूर्णपणे बरे होईल की नाही.”

आजारासाठी शाकाहारी आहार खाण्याचा निर्णय

या आजाराशी लढण्यासाठी सनाने (Sana Makbul) शाकाहारी आहार खाण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितलं आहे. कारण शाकाहारी आहाराचा शरीरावर सकरात्मक परिणाम होतो. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) जिंकल्यानंतर सनाने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले. तिने ‘बिग बॉस १८’ चा विजेता करणवीर मेहराबरोबर एक म्युझिक व्हिडीओ केला. अलीकडेच, ती नेझीबरोबर ‘भामाई’ नावाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. त्यामुळे आजारपणातही सना तिच्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

Story img Loader