टीव्हीवरील सर्वांत जास्त कॉन्ट्रोवर्शिअल रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस OTT’ मध्ये ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि टीव्ही अभिनेता प्रतीक सहजपाल आपल्या हटके स्टाइलने एन्ट्री करणार आहे. त्याचा एक प्रोमो समोर आलाय. बिग बॉस ओटीटीच्या या नव्या प्रोमोमध्ये प्रतीक सेहजपाल स्टेजवर जबरदस्त एन्ट्री करताना दिसून येतोय. सोबतच शो मध्ये आल्यानंतर करण जोहर समोर एक जबरदस्त शायरी बोलताना दिसून येणार आहे. प्रतीक सहजपालच्या या हटके स्टाइलमधल्या शायरीवर करण जोहरची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस OTT च्या या नव्या प्रोमोमध्ये प्रतीकने पॅन्ट आणि त्यावर एक गाऊन परिधान केलेला दिसून येतोय. सुरूवातीला तो त्याच्या एका डायलॉगने स्वतःची ओळख करून देतो. ‘ना मैं हूं तूफान, ना हूं आंधी, मैं हूं प्रलय, हूं पूरी बर्बादी. मेरे हर कदम पे मैंने पूरी कायनात हिला दी. मैं भगवान हूं और मैं शैतान भी हूं. मेरा दूसरा नाम है कर्मा एंड आई शैल बी सून लॉन्च्ड इन धर्मा.” असं तो आपल्या शायराना अंदाजात बोलतो. ही शायरी ऐकून स्टेजवर होस्टिंग करणाऱ्या करण जोहरचं डोकं अक्षरशः चक्रावून जातं. प्रतीकच्या या शायरीला करण जोहर सुद्धा त्याच्या स्टाइलने उत्तर देतो. “इट इज पोएट, बट इट इज नाट…” असं करण जोहर म्हणतो.

डान्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा ‘बिग बॉस ओटीटी’च्या सेटवर आपल्या अदाकारीचा तडका लावण्यासाठी पोहोचलीय. आपल्या ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना मलायका अरोरा दिसणार आहे. आज रात्री ती ‘परम सुंदरी’ या गाण्यावर आपला डान्स परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. व्हाइट कलरची साडी आणि बॅकलेस ब्लाउजमध्ये मलायकाचा हॉट अंदाज दिसून येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott contestant prateek sahajpal told himself catastrophe and ruin prp