‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्फी सतत तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. कधी पॅन्टची बटन उघडी ठेवल्यामुळे तर कधी सॉक्स पासून बनलेला टॉप परिधान केल्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. पुन्हा एकदा उर्फी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. समोरून पाहिल्यानंतर हा एक पारंपारिक ड्रेस वाटतो. मात्र, उर्फीने त्या ड्रेसवर स्कारफसारखा एक कपडा लावला आहे.

आणखी वाचा : करीनाने शेअर केला बिकिनीमधील मिरर सेल्फी; कॅप्शनमध्ये म्हणाली, “चला उन्हाळा…”

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

urfi javed, urfi javed troll,
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘फॅशनचा घोटाळा पुन्हा आला आहे’, असे कॅप्शन विरलने दिले आहे. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘हिला कोणी चांगला स्टाईलिस्ट द्या.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही स्त्री खरंच पागल वाटते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हिजाबला बदनाम करते,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Story img Loader