‘बिग बॉस ओटीटी’ या शो चा महाअंतिम सोहळा जसा जवळ येतोय तसं प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. या आठडयात स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवायला घरात त्यांचे नातेवाईक आले आहेत. घरात खूप इमोशनल  वातावरण झाले आहे. नातेवाईक आल्यावर घरातील स्पर्धकांना फ्रीझ होऊन उभे राहायचे होते. एका फेरीत शमिता शेट्टीची आई शमिताला प्रोत्साहन देण्यासाठी, तिला सल्ला देण्यासाठी आली होती. त्यावेळेस शमिताने तिच्या आईशी खुप गप्पा मारल्या आणि आईला अनेक प्रश्न विचारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शमिताची आई सुनंदा शेट्टी जेव्हा बिग बॉस ओटीटीच्या घरात आल्या तेव्हा तिने घरातील सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. मग राकेशची विचारपूस करत शमिता आणि राकेशची जोडी बाहेर ट्रेंड करत असल्याचे सांगितले. तसंच राकेशला तु दुसऱ्या कोणासाठी बदलू नकोस, तू तुझा गेम तुझ्या पद्धतीने खेळ असा सल्ला देखील दिल्याचे या भागात पाहायला मिळाले. शमिताने तिच्या आईला राकेश तुला क्युट वाटतो का? असा प्रश्न विचारला या वर शमिताची आई म्हणाल्या, “तो एक सज्जन माणूस आहे आणि तो खुप गोड आहे.” आईचे हे उत्तर ऐकून शमिता खुश झाली.

पुढे शमिताने घरातील सदस्य तिला बॉसी आहेस असे म्हणतात, ते खरे आहे का?, असा प्रश्न विचारला. शमिताच्या आईने यावर उत्तर देत म्हणाली, “तू कोणत्या ही प्रकारे बाॅसी नाही आहेस, तु तुझ्या डोक्यावर सोनेरी शिंग घेऊन आली नाहीस. तू इतर मुलींसारखीच एक साधी मुलगी आहेस. दुसऱ्यांसाठी तुला बदलायची गरज नाही. तू कोण आहेस हे मला माहिती आहे आणि जगाला काय वाटत ते मी सांगते, तू  त्यांच्या हृदयातील  राणी आहेस. घरातील सदस्यांनी  तुझ्यावर केलेले आरोप योग्य नाही पण ठिक आहे, चढ-उतार  तर जिवनाचा  भाग आहे.”