‘बिग बॉस १५ ओटीटी’चा हा सिझन दिवसेंदिवस अजून मनोरंजक होत चालला आहे. स्पर्धकांची भांडण, घरात होणारे टास्क या सगळ्यात एक नवीन नातं खुलून आले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आणि घराच्या बाहेर राकेश बापट आणि शामिता शेट्टीमध्ये वाढणाऱ्या जवळीकतेवरून तुफान चर्चा सुरू आहे. ते राकेशचं शमिताला किस करणं असो किंवा तिची  त्याच्या प्रति असलेली काळजी. प्रेक्षकांना त्यांची ही जोडी आवडत असून त्यांच्यामधील असलेल्या या नात्याबद्दल आता राकेश बापटची बहीण शितल बापटने तिचे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शितलने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मला वाटतं की हे खूप गोड आहे…त्यांच्यामध्ये असलेले नातं  खुप छान आहे…आम्ही एकमेकांशी खुप क्लोज आहोत मात्र हा राकेशचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आम्ही त्याच्या मताचा आदर करतो.”

शितल पुढे म्हणाली,”त्याने बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा पण आम्ही काहीच बोललो नाही. कारण त्याने प्रोफेशनल लाईफमध्ये आजवर त्याने घेतलेले सगळे निर्णय योग्य होते.” दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिताचा आणि राकेशचा रोमँटिक अंदाजातला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होता आहे. या व्हिडिओमुळेच नेटकऱ्यांना ते प्रेमात पडले आहेत का अशी शंका येते आहे.