‘बिग बॉस ओटीटी’ ची स्पर्धक, भोजपुरी चित्रपटसृष्टितील लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या शो मधील परफॉर्मन्ससाठी चांगलीच चर्चेत होती. मागच्या आठवड्यात ती या शो मधून कनेक्शन मिलिंद गाबा सोबत बाहेर आली. शो मधून बाहेर आल्यावर अक्षराने शो बाबत अनेक खुलासे केले आहेत. तिने या शोमधे फिक्सींग असून या शो चा सूत्रसंचालक करण जोहर कंटेस्टेंट्समध्ये भेदभाव करत आहे. आता अक्षराने तिच्या खासगी आयुष्या बाबत मोठा खुलासा केला आहे.
अक्षराने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्या बाबत बोलताना सांगितले की एक काळ असा होता की मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांनी तिची साथ सोडली होतो. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचे करिअर खराब करण्याची धमकी दिली होती. तो काळ तिच्या साठी खुप कठीण काळ होता. मात्र हिमतीने ती या परिस्तिथिला सामोरी गेली. या सगळ्यातून बाहेर यायला तिला तिच्या वडिलांनी मदत केली असे तिने मुलाखतीत सांगितले.
अक्षराने तिच्या एक्स बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडवर अनेक आरोप केले आहेत. तिने त्या मुलाखतीत सांगितले की, रस्त्यावर नशा करणारी माणसं त्याने माझ्या पाठी लावली होती आणि त्यांच्या हातात अॅसिडची बाटली होती जेणेकरून माझे करिअर संपेल. मी देवापाशी हीच प्रार्थना करते की मी ज्या परिस्थितीतून गेले तशी परिस्थिती कोणावरही येवू नये.”
View this post on Instagram
अक्षराने एक्स बॉयफ्रेंड बाबत खुलासा करताना पुढे म्हणाली, “त्याने मला खुप धमक्या दिल्या होत्या. मात्र मी जेव्हा माझ्या वडिलांशी बोलले, त्यांनी मला यातून बाहेर पडायचे बळ दिले आणि मी माझ्या मनातली भीती मागे सोडत पुढे नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला.” अक्षरा सोबत घडलेल्या या प्रसंगामुळे, तिच्या सोबत कोणी नव्हते तसंच सर्व जण तिला त्या इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस तिने स्वत:ला कसे सावरले आहे हे तिलाच माहिती असे सांगितले.” दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’ मधील तिच्या परफॉर्मन्स पाहुन तिचे चाहते खुप खुश आहेत. तसंच अक्षरा शो मधून अचानक बाहेर पडल्याने तिचे फॅन्स ‘बिग बॉस ओटीटी’ दोष देत आहेत.