‘बिग बॉस’चे ओटीटी व्हर्जन वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. हा वादग्रस्त तितकाच लोकप्रिय शो आहे. बिग बॉसमधील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. बिग बॉसचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  घरात साध्य अभिनेता राकेश बापटची मजबूत खिल्ली उडवली जात आहे. या मागचे कारण आहे अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत त्याची झालेली जवळीक. त्यांची ही जवळीक इतर स्पर्धकांना खटकत आहे. त्यामुळे हे सदस्य राकेश आणि शमिता बद्दल बोलताना चर्चा करताना दिसतं आहेत. नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातला एक व्हिडीओ सोशाल मीडियावर चांगलाच व्हायरल झला आहे. यात अभिनेत्री रिद्धिमा पंडितने राकेश बापटवर एक कमेंट पास केली आहे. तिच्या या कमेंटवर नेटकरी नाराज झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १५’ओटीटीच्या घरात शमित आणि राकेश बापटचे चांगले बॉंडिंग आहे. त्यांचे विचार एक असल्याने ते नेहमी एकत्र दिसतात. बिग बॉस ओटीटीच्या घरात जास्त काळ राहाण्यासाठी प्लान करताना दिसतात. मात्र त्यांची ही जवळीक घरतली काही लोकांना खटकते आणि ते त्यांची खिल्ली उडवताना दिसतात आहेत. बिग बॉस ओटीटीच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पर्धक रिद्धीमा पंडितने राकेश बापटला शमिता शेट्टीचा पाळलेला कुत्रा म्हणून संबोधले आहे. तसंच ती शमिताची नक्कल देखील या व्हिडीओत करताना दिसली आहे. यात रिद्धिमा पंडित, करण नाथ, मूस, निशांत भट्ट हे रिद्धिमाने केलेली नक्कल पाहत होते. रिद्धिमाच्या या कमेंटवर काही नेटकरी भडकले आहेत.

बिग बॉस ओटीटीच्या या क्लिपमुळे सोशल मीडियावर नेटकरी रिद्धिमा पंडितवर नाराज झाले आहेत. तसंच या व्हिडीओ खाली ते रिद्धिमा “तुला लाज नाही वाटत का?” असं लिहिलं आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ ओटीटीच्या घरात रक्षाबंधनाचा साण साजरा करण्यात आला होता. या वेळेस बिग बॉसची एक्स स्पर्धक हिना खान स्पर्धकांच्या घरातील जवळच्या व्यक्तींचे व्हिडीओ भेट म्हणून आणले होते. या वेळेस शमिता आपल्या बहीणीचा म्हणजेच शिल्पा शेट्टीचा मेसेज पाहून भावूक झाली होती. ‘बिग बॉस’चे ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन लोकप्रिय दिग्दर्शक निर्माता करण जोहर करत आहे. नुकताच याच्या टीव्ही व्हर्जनचा प्रोमो प्रदर्शित करण्यात अला. ज्यात सलमान खान ‘बिग बॉस’ १५च्या थीम विषयी बोलताना दिसला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott update riddhima calls rakesh bapat paltu kutta of shilpa shetty video went viral aad