छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्यानंतर विशाल हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या विशाल निकम हा विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत. वारकऱ्यांच्या मनातली ही भावना पंढरीच्या पांडुरंगा या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओद्वारे मांडण्यात आली आहे. विशाल निकम या म्युझिक व्हिडीओद्वारे विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहे. हा म्युझिक व्हिडीओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल.
“ती एक….”, अखेर विशाल निकमने उघड केले सौंदर्याबद्दलचे ‘ते’ सत्य
साईनाथ राजाध्यक्ष आणि बिना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकनं पंढरीच्या पांडुरंगा या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. हे शब्द प्रवीण भुसे यांचे असून ते विशाल भांगे यांनी संगीतबद्ध केले आहेत. तर प्रवीण कुंवर यांनी हे गाणं गायलं आहे. त्यासोबत संगीत संयोजन विशाल सदाफुले यांचं आहे. या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन नवनाथ निकम आणि छायांकन मंगेश गाडेकर यांनी केलं आहे. यात विशाल निकमसह रेखा डी. सुहास जाधव हेदेखील पाहायला मिळत आहेत.
“हळद लागली, हळद लागली…”, विशाल निकमची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ असे या गीताचे शब्द आहेत. तसेच तितक्याचं श्रवणीय संगीतानं हा म्युझिक व्हिडीओ सजला आहे. वारकऱ्यांच्या मनातील विठ्ठला प्रती असलेली आर्तता नेमकेपणानं मांडण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक खेळ आणि ग्यानबा, तुकारामच्या घोषात आषाढी वारी पंढरीला जात असताना “पंढरीच्या पांडुरंगा” हा म्युझिक व्हिडीओ मनाला शांतता आणि आनंद देऊन नक्कीच सर्वांच्या पसंतीला उतरेल, अशी आशा अनेकजण व्यक्त करत आहेत.