MC Stan The Kapil Sharma Show: बिग बॉस 16 जिंकल्यानंतर, एमसी स्टॅन प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. काही आठवड्यातच त्याने मोठ्या प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अनेक विक्रम केले आहेत. आता इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर सर्वजण कधी एकदा आपला एमसी स्टॅन कपिल शर्माच्या शो मध्ये येतोय याची वाट पाहत होते. अखेरीस आता तो दिवस आला आणि आता त्याची छोटीशी झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
द कपिल शर्मा शोमध्ये लाल सूट आपले फेमस शूज घातलेला, स्टॅन नव्याकोऱ्या रॅपसह प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. यावेळी सुरुवातीला कपिलही स्टॅन च्या गाण्याचा आनंद घेत शेजारी उभा होता पण मग प्रेक्षकांच्या मागणीनंतर कपिल व स्टॅनने एकत्र गाणे गायले. कपिलने हा व्हिडीओ शेअर करत त्याला, “क्या बोलती पब्लिक, वाईब है की नही” असे म्हंटले आहे.
दुसरीकडे या शोमध्ये एमसी स्टॅनसह आलेल्या इतर कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. स्टॅनसह भुवन बाम व सोशल मीडिया क्रिएटर डॉली सिंग सुद्धा आली होती. डॉलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत “जो शो घरी जेवताना बघायचे आज तिथे पाहुणी म्हणून येणे हे खूप मोठं स्वप्न आहे” असे डॉलीने कॅप्शन लिहिले आहे.
दरम्यान, काही फॅन्सनी सांगितले की या पोस्टने कपिलला त्याच्या अकाउंटवर आतापर्यंतचे सर्वात जास्त लाईक्स मिळवून दिले. त्यांनी लिहिले, “क्या भाई २ घंटे में २ मिलियन जैसे भाई क्या पॉवर है एमसी स्टॅन का”. MC Stan च्या या व्हिडिओला ३ दशलक्षाहून अधिक लाईक्स आणि १५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या शनिवारी हा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. एमसी स्टॅनमुळे कपिलच्या शो ला एकार्थी टीआरपीची लॉटरीच लागणार आहे.