छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. ‘बिग बॉस’चे हे १५ वे पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या या पर्वाची सुरूवात एकदम दणक्यात झाली आहे. गेल्या पर्वा प्रमाणे या पर्वातही स्पर्धकांमध्ये भांडण पाहायला मिळतात. प्रतीक सहजपाल पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकाच्या भूमिकेत सगळ्यांना दिसला आहे. त्याने तेव्हा पासून स्पर्धकांशी भांडणे केली आहेत. घरात असलेल्या इतर स्पर्धकांसोबत सतत सुरु असलेल्या त्याच्या भांडणाला पाठिंबा दिल्याने आता शमितावर ‘बिग बॉस’च्या घरात असलेल्या इतर स्पर्धकांनी निशाना साधला आहे. मात्र, आता शमिता क्लास बद्दल बोलत असताना करण कुंद्राला राग आला आणि तो रागात शमिताला आंटी म्हणाला. आता करणने केलेल्या या कमेंटमुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

सुरुवातीला जय भानुशालीने प्रतीकला त्याच्या उंचीवरून चिडवतं ‘छोटू फॉलो मी’ असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे करण रागात शमिताला ‘आंटी’ म्हणाला. यावेळी करणला वाटलं की शमिता त्याच्या क्लास विषयी बोलतेय. हे ऐकल्यानंतर करणला राग आला आणि त्याने शमिताचा राग काढण्यासाठी निशांत भट्टशी बोलत असताना तिला आंटी म्हणाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर करणला ट्रोल करण्यात येत आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : “उमेश माझा जुनाच गडी पण…”; लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त प्रियाचा खास उखाणा

आणखी वाचा : “आजारानंतर सेटवर पुन्हा येऊन ते आनंदात होते अन्…”, टप्पूने नट्टू काकांसोबतचा शेवटचा फोटो केला शेअर

नेटकऱ्यांनी शोचे काही क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे क्लिप्स शेअर करत त्यांनी करणला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “तो ३६ वर्षांचा आहे आणि शमिता ४० वर्षांची आहे. तो तिला आंटी म्हणाला, मग तो सलमान खानला काय बोलेल. पण त्याच्यात तेवढी हिंमत नाही शमिताच्या पण पाठी बोलतो. सलमानच्या समोर तर तोंड उघडणार नाही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तो शमिताला आंटी बोलण्या आधी पर्यंत मी त्याचा चाहता होता. नेहमी कोणाला वयावरून बोलणं हे लाजिरवाण आणि अपमानकारक आहे. आता त्याने आदर गमावला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “३७ वर्षांचा हा माणूस ५ वर्षांनी मोठी असलेल्या शमिताला आंटी बोलतो. त्याने तिला शिवीगाळ केला आणि तिच्या वयावर बोलायला त्याला लाज वाटली नाही. गंमत अशी की ती त्याच्या क्लासवर एक शब्दही बोलली नाही,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी करणला ट्रोल केले आहे.

Story img Loader