बिगबॉस एक असा कार्यक्रम आहे जिथे वेगवेगळ्या कलाकारांना आपले प्रेम सापडते. या शोच्या १५व्या सीझनमध्ये अनेक टीव्ही स्टार्सना त्यांचे प्रेम सापडले. बिगबॉस ओटीटीमध्ये देखील स्पर्धक शमिता शेट्टीला राकेश बापटच्या रूपात तिचे प्रेम सापडले. तसेच, बिगबॉस १५च्या घरातही या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. शो संपल्यानंतरही हे दोघे बराच वेळ एकत्र घालवताना दिसले. मागील महिन्यातच शमिता शेट्टी आणि राकेश बापटने अलिबागमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला. या दोघांना बघून त्यांचे चाहतेही खुश आहेत.
परंतु सगळं सुरळीत सुरु असतानाच या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमी समोर आली. आज गुरुवारी दिवसभर या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आले होते. पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, शमिता शेट्टी आणि राकेश बापटने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शमिता आणि राकेशमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद होऊ लागले होते. याच कारणामुळे या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं. तसेच, दोघांचे विचार वेगवेगळे असल्याकारणाने दोघांमध्ये भांडणे होऊ लागली असल्याचंही म्हटलं जात होतं.
अनेक वर्षांच्या सहवासानंतरही ‘या’ कारणामुळे विभक्त होतात पतिपत्नी; लगेचच स्वभावात करा सुधारणा
दरम्यान, ब्रेकअपच्या चर्चांवर आता स्वतः राकेश आणि शमिताने मौन सोडलं आहे. दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पिंकव्हिलाच्या बातमीचा फोटो शेअर करून ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये म्हटलंय, “आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. यात तथ्य नाही.”

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे प्रेम ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाले होते. यानंतर राकेश शमिताला सपोर्ट करण्यासाठी ‘बिग बॉस १५’ च्या घरातही पोहचला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राकेश ‘बिग बॉस १५’च्या घरात जास्त काळ राहू शकला नाही. त्याचवेळी शमिताही राकेशसाठी हा शो सोडण्यास तयार होती.

तरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा
शमिता आणि राकेश यांची केमिस्ट्री पाहून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले होते. काही वेळापूर्वी राकेश, शमिता आणि तिची आई एकत्र डिनरला गेले होते. अशात अचानक समोर आलेली शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपची बातमी चाहत्यांना पचनी पडली नाही. मात्र हे प्रकरण पुढे जाण्याआधीच दोघांनी याप्रकरणी सर्व काही स्पष्ट केले आहे.