महानायक अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता सगळ्यांनाच ठाऊक आहे. देशभरात त्यांचे जितके चाहते आहेत तितकेच चाहते जगभरातही आहेत. त्यांची एक झलक बघण्यासाठी अजूनही त्यांच्या मुंबईच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होते. पण प्रत्येक चाहत्याला त्यांची झलक मिळेलच असं नाही. असाच एक बच्चनजी यांचा बाहेरच्या देशातील चाहता सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यांनी जे केलं आहे ते ऐकलं तर आपल्या सगळ्यांचे डोळे पांढरे पडतील हे नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यू जर्सीमधील एडिसन शहरात राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकी कुटुंबाने अमिताभ बच्चन यांच्या एका भव्य मूर्तीचे अनावरण केले आहे. हे करताना त्यांनी त्यांच्याच घरी एक भव्य सोहळादेखील आयोजित केला होता. बच्चन यांच्या एका फॅनक्लब तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. इथे स्थायिक असणाऱ्या रिंकू आणि गोपी सेठ या दांपत्याने त्यांच्या घराबाहेर अमिताभ बच्चन यांची एक भव्य प्रतिमा ठेवली आहे. या कार्यक्रमात तब्बल ६०० लोकं हजर होते. एका मोठ्या काचेच्या बॉक्समध्ये बच्चन यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अमिताभ त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या अवतारात बसलेले आपल्याला दिसतात. ही मूर्ती राजस्थानमध्ये तयार केली गेली आहे. या मूर्तीची किंमत ७५००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल ६० लाख रुपये इतकी आहे. याबरोबरच गोपी सेठ ‘बिग बी एक्स्टेंडेड फॅमिली’ या नावाने एक वेबसाईटदेखील चालवतात.

यावर गोपी यांनी सांगितलं की, “बच्चन साहेब हे आमच्यासाठी देवासारखेच आहेत. ते खूप साधे आहेत, आणि त्यांचे त्यांच्या चाहत्यांशी ऋणानुबंध अगदी घट्ट आहेत. इतर स्टार्स आणि बच्चन साहेब यांच्यात खूप मोठा फरक आहे, आणि म्हणूनच त्यांची ही प्रतिमा घराबाहेर ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.” गोपीजी सांगतात की खुद्द अमिताभ बच्चन यांना या मूर्तीविषयी माहिती असून, आपण या सन्मानासाठी लायक नाही आहोत असं बच्चन साहेब म्हणाले आहेत. “अर्थात हा बच्चन साहेबांचा मोठेपणा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे चाहते आहोत” असंही गोपी यांनी पुढे नमूद केलं.

आणखी वाचा : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बॉलिवूड गाण्यांवर थिरकले प्रेक्षक, ‘ऊ अंटावा’ गाणं लागताच अभिषेक बच्चन म्हणाला….

अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर रणबीर कपूर, आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय सध्या अमिताभ बच्चन हे सुरज बडजात्या यांच्याबरोबर ‘उंचाई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.