गेल्यावर्षी पांढ-या आणि लाल रंगाची बिकनी परिधान केलेली कतरिना रणबीरसोबत स्पेनच्या समुद्र किना-यावर दिसली होती. त्यानंतर सर्वत्र चर्चा होती ती या जोडीचीच. या जोडीनंतर आता नरगिस फक्री बिकनीत उदय चोप्रासोबत मालदीवमध्ये दिसली आहे.
उदय आणि नरगिसने त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या बातमीला कधीच दुजोरा दिलेला नाही. पण, ट्विटर या सोशल साइटवर ते एकमेकांबद्दल बोलताना आढळतात आणि आता हे छायाचित्र प्रदर्शित झाल्यामुळे त्यांच्यात नक्कीच काहीतरी चालू असल्याचे समजते. ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला हे दोघेजण शेवटचे एकत्र दिसले होते.
ट्विटरवर उदय चोप्राने एक खट्याळ ट्विट केले होते ते असे, नरगिस तुला माहित आहे आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. तुझ्या होणा-या मुलाचा बाबा हा माझ्या वडिलांचा मुलगा आहे. त्यावर अभिषेकनेही प्रतिक्रिया दिली होती. मात्र, काही वेळानंतर लगेचच हे ट्विट काढून टाकण्यात आले.