अमेरिकन गायिका बिली इलिश ही जगातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिलीने एक मोठा खुलासा केला आहे. बिलीने वयाच्या ११ वर्षांची असताना पॉर्न पाहायला सुरुवात केली आणि त्याचा तिच्यावर वाईट परिणाम झाला असे तिने कबुल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Howard Stern Show या रेडिओ शोमध्ये सोमवारी बिलीने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने हा खुलासा केल्याचे द गार्डियनने म्हटले आहे. बिली इलिश म्हणाली की, तिने लहानपणापासूनच पॉर्न पाहण्यास सुरुवात केली होती. पॉर्न पाहिल्यामुळे तिचं मन बिघडल्याचं तिला वाटतं आणि तिला रात्री भयानक स्वप्ने पडू लागली. तिने सांगितलं की, जेव्हा मी हे माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती खूप ओरडली होती. पॉर्नमुळे तुमची सेक्सबद्दलची समज कमी होते. जवळच्या क्षणांमध्ये सामान्य काय आहे हे तुम्हाला समजत नाही.

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

१८ डिसेंबर २००१ रोजी लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेली, बिली ही अभिनेत्री-गीतकार मॅगी बेयर्ड आणि अभिनेता पॅट्रिक ओ’कॉनेल यांची मुलगी आहे. तिच्या आईने बिलीला संगीत आणि गाणी लिहायला शिकवलं. वयाच्या चौथ्या वर्षी, बिलीने पहिलं गाणं लिहिलं आणि वयाच्या ८ व्या वर्षी तिने संगीत प्रतिभा शोमध्ये भाग घेणं सुरू केलं. २०१९ मध्ये, ग्रॅमी पुरस्कारांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की, एका तरुण गायिकेला ६ श्रेणींमध्ये नामांकन मिळाली आणि तिने पाच पुरस्कार जिंकले, त्यापैकी ४ पुरस्कारांच्या मुख्य श्रेणी होत्या.