जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी ईशादेखील नेहमीच चर्चेचा विषय असते. १९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशाने मुलाचे नाव कृष्णा तर मुलीचे नाव आदिया असं ठेवलं आहे. तर तिच्या लाईफस्टाइलकडेही सर्वांचं लक्ष वेधलेलं असतं. आता तिचा एक ड्रेस खूप चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याची किंमत.
ईशा अंबानी एक फॅशन आयकॉन आहे आणि ती तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचं भरपूर फॅन फॉलॉईंग आहे. ईशाला फिरण्याची खूप आवड आहे. ती वरचेवर विविध शहरांना भेट देत असते. तिची ही फिरण्याची आवड तिच्या सोशल मीडियावर दिसत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून तिचे वेगवेगळ्या स्टाईलमधले फोटो पोस्ट करत असते. आता तिने मध्यंतरी परिधान केलेला एक ड्रेस त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला आहे.
ईशाने काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तर त्या गाऊनला काळ्या रंगाचा पट्टा आहे. आता या ड्रेसची किंमत समोर आली आहे. orryoutfits या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या माहितीनुसार या ड्रेसची किंमत ३ लाख रुपये आहे. तर यावर लावण्यात आलेल्या काळ्या पट्ट्याची किंमत १ लाख २५ हजार इतकी आहे.
आता तिच्या या ड्रेसचे फोटो खूप व्हायरल होत असून यावर कमेंट्स करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. या साध्या दिसणाऱ्या ड्रेसची ही किंमत कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे