‘टायटॅनिक’मधील अभिनयासाठी ओळखला जाणारा बिली झेन आता ‘द गॉडफादर’साठी प्रसिद्ध असलेल्या दिग्गज अभिनेते मार्लन ब्रँडो यांची भूमिका साकारणार आहे. आगामी ‘वॉल्टझिंग विथ ब्रँडो’ या बायोपिकमध्ये झेनची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरू शकते, असे बोललं जात आहे. चित्रपटातील झेनचा लूक त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत, अनेकांनी झेन आणि ब्रँडो यांच्यातील साम्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे कौतुक केलं आहे. या काही व्हायरल झालेल्या फोटोमुळे चाहते या सिनेमाला ऑस्कर मिळणार अशी चर्चा करत आहेत.

हा चित्रपट ब्रँडो यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगावर प्रकाश टाकतो, विशेषतः त्यांनी ताहितीच्या टेटियारोआ बेटावर पर्यावरणपूरक, शाश्वत निवास स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर जे काम केलं त्यावर या चित्रपटाचा मोठा भाग असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन बिल फिशमन यांनी केले असून बर्नार्ड जज यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. ‘वॉल्टझिंग विथ ब्रँडो’चे जगभरातले पहिले प्रदर्शन इटलीमधील ट्युरिनो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार असून हा चित्रपट फेस्टिव्हलचा समारोप चित्रपट म्हणून निवडला गेला आहे.

हेही वाचा…‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

चित्रपटातील बहुतांश भाग टेटियारोआ बेटावर चित्रीत करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटाला एक नैसर्गिक आणि वास्तवदर्शी स्पर्श मिळतो. झेनने त्याला ब्रँडोंच्या शंभराव्या जयंतीच्या वर्षी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये बिली झेनने लिहिले, “मार्लन ब्रँडो यांनी त्यांच्या आयुष्यात नागरी हक्क, आदिवासी हक्क आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी असलेल्या बांधिलकीचे महत्त्व सांगितलं, त्यावर काम केलं, हाच विषय या चित्रपटाच्या कथेतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

हेही वाचा…‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

fans commented on billy zane instagram post
चाहत्यांनी बिली झेनने ‘वॉल्टझिंग विथ ब्रँडो’ या चित्रपटातील शेअर केलेल्या लूकच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. (Photo Credit – Billy Zane Instagram)

बिली झेनने चित्रपटातील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. झेनच्या हा या फोटोज मध्ये ब्रँडो यांच्यासारखा दिसत आहे यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी झेनला ऑस्कर मिळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने तर लिहिलं, “बिली झेन तुझं ऑस्कर नामांकन पक्कं आहे. मी पैज लावून सांगतो, तुझं ऑस्कर नामांकन पक्कं आहे, तुझा लूक अविश्वसनीय आहे. एका चाहत्याने लिहिलं, “बिली झेन ब्रँडोची भूमिका निभावण्यासाठी जन्मला आहे,” तर आणखी एका चाहत्याने लिहिलं “संपूर्ण टीमचा ऑस्कर पुरस्कार निश्चित! मेकअप अप्रतिम आहे.”

Story img Loader