भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाला त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी विरोध दर्शविला आहे. चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांची परवानगी न घेतल्याचा आरोप पंकजा यांनी केला आहे.
पंकजा यांचा चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणताच विरोध नाही. पण त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांवर चित्रपट तयार करण्यापूर्वी निर्मात्यांनी आमची परवानगी घेतलीच नाही. माझ्या वडिलांबाबत चित्रपटात काय दाखविले जाणार आहे याची आम्हाला माहिती असायला हवी. पण, याबद्दल आम्हाला काहीच सांगितलेले नाही. मी किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी चित्रपटाच्या कोणत्याच प्रसिद्धी कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. तर दुसरीकडे आपल्याला चित्रपट निर्मितीसाठी कोणाच्याही परवागीची गरज नसून आम्ही हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित करू असे निर्माता संजय गांधी सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
भाजप चित्रपट युनियनच्या तीन इतर सदस्यांच्या उपस्थितीत संदीप घुगे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनावर चित्रपट करणार असल्याची घोषणा २०१४ साली डिसेंबरमध्ये केली होती. ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटावर मुंडे कुटुंबियांकडून खास करून पंकजा यांनी विरोध केल्याने त्याचे १२ डिसेंबरला प्रदर्शन होऊ शकले नाही. याविषयी संजय म्हणाले की, १२ डिसेंबर २०१५ ला म्हणजे गोपीनाथजींच्या जयंतीदिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता. पण आता हा चित्रपट चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होईल.
‘संघर्षयात्रा’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर याने गोपीनाथजींची भूमिका साकारली असून श्रुती मराठे यात पंकजा यांच्या भूमिकेत दिसेल.
गोपीनाथ मुंडेंवरील ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाला पंकजा मुंडे यांचा विरोध
गोपीनाथजींच्या जयंतीदिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
आणखी वाचा
First published on: 21-12-2015 at 16:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biopic on late gopinath munde irks his family members