महाराणीच्या जीवनावर आधारित इंग्लंडमधील अशाप्रकारच्या पहिल्याच मालिकेचे प्रसारण नेटफ्लिक्स करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. डिजिटल स्पायने दिलेल्या वृत्तानुसार ‘दी क्राऊन’ या मालिकेच्या प्रदर्शनाबाबतचा ‘बीबीसी’ आणि ‘आयटीव्ही’मधील वाद संपुष्टात आला आहे. ‘दी क्राऊन’ या मालिकेवर ‘लेफ्ट बँक पिक्चर्स’ने काम केले आहे. वयाच्या २६व्या वर्षी राजगादीवर बसण्यापासून ते आत्तापर्यंतचा महाराणीचा जीवनप्रवास ‘दी क्राऊन’मध्ये दाखविण्यात येणार आहे. या नाट्यमय प्रवासात ब्रिटनमधील सहा दशकांच्या राजकीय पृष्ठभूमीवर कटाक्ष टाकण्यात येणार आहे. २००६ सालच्या ‘दी क्विन’ चित्रपटासाठी काम करणाऱ्या पीटर मॉर्गन यांनी ‘दी क्राऊन’ची कथा लिहिली आहे. अलिकडेच ‘दी ऑडिअन्स’ चित्रपटात क्विनची भूमिका साकारणाऱ्या हेलन मिर्रेनला दिग्दर्शित करणारे स्टिफन डालड्रेसुद्धा या मालिकेवर काम करत आहेत. १०० दशलक्ष पाऊण्ड खर्चाच्या या मालिकेचे प्रसारण २०१६ पासून नेटफ्लिक्सवर करण्यात येणार आहे. अधिकृतरित्या सर्वबाबी पार पडल्यावर लेफ्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अॅण्डी हरीस आणि मेरिगो केहो हे ‘दी क्राऊनच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात करतील.

Story img Loader