बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु आहे. विशेषत: जर चित्रपट हा कोणत्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर असेल तर मग क्रिकेट चाहत्यांचा आनंद हा शिगेला पोहोचतो. या आधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडूलकर यांच्या आयुष्यावर आपल्याला बायोपिक पाहायला मिळाल्या आहेत. आता लवकरच कपिल देव, मिताली राज यांची बायोपिक आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान, आता लवकरच भारतीय टीमचे सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली यांची बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

एका रिपोर्टनुसार, सौरव गांगुली यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक बनवण्यासाठी मान्यता दिली आहे. हा चित्रपट Viacom यांच्या बॅनर खाली बनवण्यात येणार आहे. मात्र, सौरव गांगुली यांची भूमिका कोण साकारणार या विषयी अजुनही कोणती माहिती मिळालेली नाही. मात्र, रणबीर कपूर त्यांची भूमिका साकारू शकतो अशी चर्चा सुरु आहे.

यापूर्वी एका मुलाखतीत दादांनी सांगितले होती की हृतिक रोशन हा त्यांच्या आवडता अभिनेता आहे. त्यानंतर हृतिक सौरव यांची भूमिका साकारेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सौरव यांनी या विषयी सांगितले होते. सौरव यांनी कोणत्या विशिष्ट अभिनेत्याचा विचार केला नव्हता. मात्र, त्यांनी सांगितले की हृतिकला जर भूमिका साकारायची असेल तर त्याला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल.  “अनेक लोक बोलतात की तुम्ही हृतिक सारखी बॉडी बनवा. पण माझा विश्वास आहे की माझी बायोपिक करण्यासाठी हृतिकला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल,” असे सौरव गांगुली म्हणाले.

आणखी वाचा : ‘निक प्रियांकाला १० वर्षांमध्येच घटस्फोट देईल?’; केआरकेची धक्कादायक भविष्यवाणी

आणखी वाचा : जॅकलिनने पुन्हा एकदा केल टॉपलेस फोटोशूट, पाहा फोटो

गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूच्या बायोपिकमध्ये ‘एमएस धोनी’, ‘मिल्‍खा सिंग’, ‘मेरीकॉम’, संदीप सिंग यांच्या आयुष्यावर ‘सूरमा’ असे चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी सायना नेहवालच्या आयुष्यावर ‘सायना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर लवकरच १९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमच्या आयुष्यावर ‘८३’ हा चित्रपट येणार आहे.

Story img Loader