अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण त्यानंतर तिने पुन्हा डोहाळे जेवण करण्याचं ठरवलं. नुकताच तिचा दुसऱ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रामधील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. बिपाशा-करण या कार्यक्रमामध्ये अगदी उठून दिसत होते. मात्र यावेळी बिपाशाला अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

बिपाशा बासूला अश्रू अनावर

बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच आपण आई-बाब होणार असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. पुन्हा एकदा तिने हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. तिच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये बिपाशाला अश्रू अनावर झाले असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये दोघंही एकत्र केक कापताना दिसत आहेत. तसेच एकमेकांना केक भरवत आहेत. करण आपल्या पत्नीला म्हणजेच बिपाशाला किस करतो तसेच तिला आनंदाच्या भरात मिठी मारतो. नवऱ्याचं आपल्यावर असणारं प्रेम पाहूनच बिपाशाला अश्रू अनावर झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – …अन् करीना कपूरने बिपाशा बासूच्या कानाखाली मारली, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

बिपाशादेखील करणला घट्ट मिठी मारते. या सेलिब्रिटी कपलचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावेळी बिपाशाने पिच रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर करणने निळ्या रंगाचा कोट व त्याच रंगाची पँट परिधान केली होती. बिपाशा-करणने मुंबईमध्ये डोहाळे जेवणाचं अगदी जंगी सेलिब्रेशन केलं.

Story img Loader