बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली. तिच्या हेअर स्टायलिस्टकडून मेकअपचे एक उपकरण बिपाशावर पडल्याने तिचा चेहरा आणि हात भाजला गेला. बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भाजलेल्या हाताचा आणि चेहऱयाचा फोटो शेअर घडलेल्या प्रकारची माहिती दिली.

बिपाशाचा चेहरा आणि हात भाजला.
बिपाशाचा चेहरा आणि हात भाजला.

बिपाशाच्या चेहऱयाला दुखापत झाल्याची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करण्यास सुरूवात केली. तिच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर असंख्य मॅसेजेस येऊ लागले. बिपाशाने काही दिवसांनंतर आरशात पाहणारा एक छानसा फोटो सोशल मीडियावर शेअर करून मी आता ठीक असल्याचे चाहत्यांना सांगितले. तसेच आपली काळजी करणाऱया चाहत्यांचे तिने आभार देखील व्यक्त केले.

Story img Loader