आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशा गरोदर असताना मात्र तिचा पती करण एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ

गरोदरपणात बिपाशाची काळजी करण घेत आहे. दोघंही हे सुंदर क्षण एण्जॉय करताना दिसत आहेत. बिपाशाचं गरोदरपणातील फोटोशूट असो वा व्हिडीओ सारं काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. करण तर विविध खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी फुड मॉलमध्ये गेला होता. अर्थात बिपाशासाठी तो ही सगळी मेहनत करत आहे. यादरम्यान फुड मॉलच्या बाहेरच पापाराझी छायाचित्रकारांनी करणला घेरलं.

पाहा व्हिडीओ

यादरम्यानचा त्याचा हा व्हिडीओ काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये करणच्या हातात सामानाची मोठी पिशवी दिसत आहे. करण फुड मॉलच्या बाहेर येताच रस्त्यावरील एक मुलगी त्याच्याकडे मदतीचा हात मागते. मात्र त्या मुलीला टाळत करण कारमध्ये बसून निघून जातो. त्याचं हे वागणंच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं नाही.

आणखी वाचा – “तुम्ही खूप लवकर आम्हाला सोडून गेलात आणि…” प्रदीप पटवर्धन यांच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत

करण तुझं हे वागणं चुकीचं आहे, त्या मुलीला मदत करायला हवी होती अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत. त्याचबरोबरीने करणला त्याच्या या वागणूकीमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu husband karan singh grover troll and his video goes viral on social media see details kmd