आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिपाशाने पती करणबरोबर खास फोटोशूट केलं आहे. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा फोटो

बिपाशा म्हणाली, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”

आणखी वाचा – “त्याक्षणी डोळ्यात पाणी आलं अन्…” कौतुक करत अमिताभ बच्चन जेव्हा समीर चौगुलेच्या पाया पडले

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. एकूणच काय तर बिपाशा-करणच्या आयुष्याची आता नवी सुरुवात झाली आहे.

Story img Loader