बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून गुरूवारी या दोघांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली. येत्या ३० एप्रिलला बिपाशा आणि करण विवाहबंधनात अडकणार आहेत. आम्हाला ही बातमी सांगताना आनंद होत आहे. ३० एप्रिलचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आमचे लग्न हा खासगी सोहळा असेल, असे या दोघांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले आहे. करणचे हे तिसरे लग्न आहे, तर बिपाशाचे यापूर्वी अभिनेता जॉन अब्राहम याच्याशी प्रेमसंबंध होते. सुरूवातीला या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून विरोध होता. बिपाशा बसूच्या आईने तर स्पष्टपणे या दोघांच्या नात्याला विरोध करत बिपाशाला करणपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे करणच्या आईलाही बिपाशा सून म्हणून नको होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनीही करणला बिपाशापासून दूर होण्याचा सल्ला दिला होता.
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली होती. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले. दरम्यान, करणने त्याची पत्नी जेनेफरशी घटस्फोट घेतल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. २०१२ साली करणचे जेनेफरशी लग्न झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा