अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर येत्या ३० तारखेला विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे सध्या या दोघांची लग्नाच्या कपड्यांपासून अन्य गोष्टींच्या तयारीसाठी जोरदार धावपळ सुरू आहे. दरम्यान, आज बिपाशाचा संगीत सोहळा असण्याची शक्यता असून या सोहळ्यासाठी तिने खास लेहंगा तयार करवून घेतला आहे. बिपाशाच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाईट आणि लाल रंगातील या लेहंग्याचे छायाचित्र शेअर केले असून …And it all begins असा संदेश लिहला आहे. उद्या जुहू येथील क्लबमध्ये बिपाशा आणि करणचा मेंहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर ३० तारखेला हे दोघेजण लग्नाच्या बोहल्यावर चढतील.
‘दोन संसार मोडले असले तरी विवाहसंस्थेवरचा माझा विश्वास अजूनही कायम
बिपाशा आणि करणची लगीनघाई!
संगीत सोहळ्यासाठी बिपाशाने खास लेहंगा तयार करवून घेतला आहे.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा
Updated:
First published on: 28-04-2016 at 08:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu karan singh grover wedding ceremonies begin see pics