बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघंही नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आताही या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे बिपाशा बासू प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिपाशा बासूचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशा बासू निळ्या रंगाच्या ओव्हरसाइझ शर्टमध्ये दिसत आहे. त्यामुळेच ती प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे तिचा पती करण सिंग ग्रोवर मात्र या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

बिपाशा आणि करण यांच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘ही नक्कीच प्रेग्नंट आहे. ग्लोइंग मम्मी ओव्हरसाइज ड्रेसमध्ये.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘बिपाशा प्रेग्नंट आहे कारण ती मागच्या काही महिन्यांपासून सैलसर कपडे घालताना दिसत आहे.’ एकीकडे बिपाशाच्या प्रेग्नन्सीची चर्चा होतेय तर दुसरीकडे तिचा पती ट्रोल्सच्या निशाण्यावर आला आहे.

आणखी वाचा- मलायकानं शेअर केला बेडरुममधील खास फोटो, ‘त्या’ गोष्टीनं वेधून घेतलं सर्वांचं लक्ष

या व्हिडीओमध्ये करण सिंग ग्रोवरला पाहिल्यावर अनेकांनी त्याच्या वागण्यावरून ट्रोल केलं आहे. एका युजरनं लिहिलं, ‘हा अबनॉर्मल आहे असं फक्त मलाच वाटतंय की इतरांनाही असं वाटत आहे.’ दुसऱ्या एका युजरनं करणवर टीका करताना लिहिलं, ‘करण असा का वागत आहे.’ तर काही लोकांनी त्याचं वागणं फारच विचित्र असल्याचं म्हटलं आहे. अर्थात हे फक्त युजर्सचं म्हणणं आहे. दरम्यान प्रेग्नन्सीच्या चर्चांवर अद्याप बिपाशा किंवा करण यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.