बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच स्वत:चे ‘trunklabel.com’ हे ‘फॅशनेबल वस्तूं’चे ‘ऑनलाईन स्टोअर’ सुरू करीत आहे. आपल्या ‘फिटनेस सीडी’चे मार्केटिंग केल्यानंतर आता बिपाशा फॅशनच्या क्षेत्रात उतरली आहे. या ‘ऑनलाईन स्टोअर’ विषयी बोलतांना ती म्हणाली, फिटनेसच्या क्षेत्रात काम केल्यानंतर मला फॅशनच्या क्षेत्रात कार्यरत होण्याची इच्छा होती. यासाठी मी विविध ‘फॅशनेबल वस्तूं’चा पुरवठा करण्यापासून सुरूवात करण्याचे ठरवले. तिच्या या ‘ऑनलाईन स्टोअर’मधून बेल्ट, ज्वेलरी आणि बॅगसारख्या विविध वस्तूंची खरेदी करता येणार आहेत. आपल्या सवडीप्रमाणे खरेदी करण्याची सोय ‘ऑनलाईन स्टोअर’मध्ये असल्याने आपण ‘ऑनलाईन स्टोअर’ सुरू केल्याचे ती म्हणाली. जागा घेऊन एखादे दुकान सुरू करणे ही जुनी संकल्पना असून, ‘ऑनलाईन स्टोअर’ हा अधुनिक प्रकार आहे. याद्वारे तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहचू शकत असल्येचे देखील ती म्हणाली.
त्याचप्रमाणे, या महिन्यात तिची ‘अनलिश्ड’ नावाची फिटनेसवरची तिसरी डीव्हीडी प्रसिध्द होण्याची शक्यता असल्याचे समजते.

Story img Loader