जर तुमच्याकडे चांगली शरीरयष्टी आणि आत्मविश्वास असेल, तर मोठ्या पडद्यावर बिकनीतील दृश्य तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे साकारू शकता, असे बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचे म्हणणे आहे. चित्रपटात बिकनी घालणे ही माझ्यासाठी फार मोठी बाब नाही. जर तुमची शरीरयष्टी चांगली असेल, तर तुम्ही बिकनीमध्ये सुंदर दिसाल. ग्लॅमरस चित्रपट तुमच्या ग्लॅमरस दिसण्यात आणखी भर घालत असल्याचेदेखील ती म्हणाली. ‘धूम २’ आणि ‘प्लेअर्स’ या चित्रपटांमधून ती टू-पीस बिकनीमध्ये दिसली होती. याविषयी बोलताना ती म्हणाली, पहिल्यांदा जेव्हा मी बिकनी घातली होती, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. परंतु, आता माझ्यासाठी ही मोठी बाब राहिलेली नाही. ‘धूम २’ चित्रपट करताना मी फिटनेसचे धडे गिरवत होते. परंतु, बिकनीसाठीच्या योग्य शरीरयष्टीचे महत्व लक्षात आल्यावर फिटनेससाठीचा जोमाने सराव सुरू केल्याचे तिने सांगितले. बिकनी परिधान करण्यासाठी चांगल्या शरीरयष्टीची गरज असल्याचा सल्लासुद्धा तिने दिला. पुढे ती म्हणाली, मी ‘प्लेअर्स’ चित्रपटात बिकनी परिधान केली हेती, ‘हमशकल्स’वाल्यांनादेखील आम्ही बिकनी घालावी असे वाटत होते… याबाबत आपण अधिक विचार करत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. बिपाशा सध्या ‘क्रिचर ३डी’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असून, विक्रम भट दिग्दर्शित हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा