अभिनेत्री बिपाशा बासूची भूमिका असलेला ‘क्रिचर ३डी’ हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात चित्रपटगृहात झळकणार आहे. ‘यारियां’ आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘भूतनाथ रिटर्नस्’ चित्रपटानंतर टी-सिरिज बीव्हीजी फिल्म्सच्या सहयोगाने विक्रम भट दिग्दर्शित ‘क्रिचर ३डी’ हा ‘साय-फाय थ्रिलर’ प्रकारातील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाद्वारे इमरान अब्बास चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २७ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ‘हॉन्टेड’ चित्रपटानंतर विक्रम भटचा हा दुसरा ३डी प्रकारातील चित्रपट असून, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करून यातील भयानक प्राणी साकारण्यात आला आहे. अशाप्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.