बॉलीवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी, सुष्मिता सेन, राणी मुखर्जी, बिपाशा बासू आणि कोंकणा सेन शर्मा या बंगाली सौंदर्यवतींचा पश्चिम बंगाल सरकराकडून गौरव करण्यात आला आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभादिवशी या अभिनेत्रींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पाच कन्या असे नाव देण्यात आले होते.
यावेळी पाच अभिनेत्रींनी पुरस्काराकरिता धन्यवाद मानले आणि बंगाली असल्याचा मान असल्याचेही म्हटले. हा सत्कार सोहळा कोलकाता आंतरष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभाचे विशेष आकर्षण ठरला.

Story img Loader