एक काळ असा होता की, रुपेरी पडद्यावरील तिची आणि त्याची जोडी सर्वात हॉट पेअर होती. पडद्यामागेही त्यांच्यातील गुटर्रगूची चविष्टपणे चर्चा होत असे. कालांतराने असा काही सिलसिला घडला की दोघांची तोंडे दोन दिशांना झाली, परस्परांकडे पाठ फिरली. तरीही परस्परांबद्दल दोघेही मनात एक हळवा कोपरा बाळगून आहेत. रेखा आणि अमिताभ यांच्यातील नाते आजही अव्यक्तच राहिले आहे. या दोघांचेही वाढदिवस १० आणि ११ ऑक्टोबर रोजी लागोपाठच्या दिवशी यावेत हाही एक योगायोगच. पण आज वयाची ६१ वर्षे पूर्ण करणारी रेखा येणारा प्रत्येक दिवस एक नवे वरदान मानून जगते आहे.‘सावन भादो‘ ते‘कुडियों का है जमाना‘ असा रुपेरी प्रवास करणाऱ्या बोल्ड अँड ब्युटिफूल रेखाने आयुष्यातील प्रत्येक नवा दिवसच वाढदिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. सुपरनानी या चित्रपटाने तिने गेल्यावर्षी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. तर दुसरीकडे, आजच्या पिढीलाही लाजवेल इतक्या जोशाने अमिताभ अजूनपर्यंत काम करत आहे.‘रेखाने आणि अमिताभने आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवताना एका वेगळ्या अर्थाने ही उक्ती सार्थ ठरवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा