बॉलीवूडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलने फक्त हिंदी नाही तर तमिळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयापेक्षा बाकीच्या कारणांमुळेच जास्त चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा. अमिषाचा जन्म ९ जून १९७६ रोजी मुंबईत झाला होता. अमिषाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. अमिषाने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले. आपल्या मुलीच्या यशाने अमीषाचे आई-वडीलही खूप खूश होते, पण जेव्हा या मुलीने आपल्या वडिलांना कायदेशीर नोटीस पाठवली तेव्हा तिने बरेच मथळे केले.
आणखी वाचा : तीन दिवस आधी करोना पॉझिटिव्ह झालेल्या शाहरुखने लावली नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नात हजेरी, पाहा फोटो
आतापर्यत अमिषानं ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या करिअरचा ग्राफ हा नेहमीच खाली येताना दिसला. याला कारण तिचा स्वभाव. नेहमीच वेगवेगळ्या वादात अडकलेल्या अमिषाला अनेक निर्मात्यांनी नाकारले. अमिषाने तिच्या वडिलांना सुमारे १२ कोटी रुपये हडप केल्याचा आणि खात्यांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. अमिषा तिच्या वडिलांवर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खूप चर्चेत होती. तिच्या चाहत्यांना ही गोष्ट काही आवडली नाही. तेव्हापासून अमिषाच्या लोकप्रियतेत घट होण्यास सुरुवात झाली. सोशल सध्या अमिषा तिचे काही बोल़्ड फोटो शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते.
आणखी वाचा : लग्नानंतर ‘या’ आलिशान घरात राहते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर
अमिषा पटेलने अजून लग्न केलेले नाही. अमिषा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा भागही आहे.