आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा. तिचे फारसे चित्रपट नसले तरी तिचे चाहते असंख्य आहेत. आज ९ डिसेंबर रोजी दियाचा वाढदिवस आहे. १९८१ मध्ये दियाचा जन्म हैद्राबाद येथे झाला. तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबच अभिनेता आर माधवन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत दियाने लाखो चाहत्यांच्या मानत घर केले. या एकाच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दियाने ‘दीवानापन’, ‘तुमको न भूल पाएंगे’, ‘दम’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘संजू’ या चित्रपटात देखील काम केले आहे. दिया चार वर्षांची असताना तिच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिच्या आईने हैद्राबादमधील अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केले. वयाच्या १६व्या वर्षी दियाने नोकरी करण्यास सुरुवात केली होती. तिने एका मल्टीमीडिया कंपनीमध्ये मार्केटिंग एक्सीक्यूटिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच दियाला मॉडलिंगच्या ऑफर येत होत्या.

साल २००० मध्ये दियाने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती सेकेंड रनर अप ठरली. दरम्यान तिला मिस ब्यूटीफूल स्माइल, मिस एवॉन आणि मिस क्लोजअप स्माइल हे तीन किताब मिळाले होते. १८ वर्षांची असताना तिने मिस आशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. याच वेळी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता तर लारा दत्ताने मिस यूनिवर्सचा किताब जिंकला होता.

आणखी वाचा : संजय दत्तला मिळाली ३०९ वी गर्लफ्रेंड, तिचे नाव आहे…

दियाने अनेक वर्ष डेट केल्यानंतर १८ ऑक्टोबर २०१४ मध्ये साहिल सांगाशी लग्न केले होते. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. काही महिन्यांपूर्वीच दियाने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतरही दिया आणि साहिल चांगले मित्र असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday special diya mirza life struggle avb